सातारा : अपघात प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कारी ता.सातारा गावच्या हद्दीत अपघात झाल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. रमेश आनंदराव लोहार (वय 48, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. 15 ऑक्टोबर रोजी लोहार यांच्या दुचाकीला अज्ञात चारचारकी वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. अपघातानंतर संबंधित वाहन चालक तेथे न थांबता निघून गेला.