जिल्हाधिकारी कार्यालयात हिंद-दि-चादर" प्रचार प्रसार कार्यक्रम दौरा

by Team Satara Today | published on : 25 February 2026


सातारा  : श्री. गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समापन कार्यक्रमा निमित्त नवी मुंबईमध्ये 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी आयोजित "हिंद-दि-चादर" प्रचार प्रसार कार्यक्रम दौरा नियोजन भवन जिल्हाधिकारी सातारा येथे आयोजित करण्यात आला.

सदर कार्यक्रमांच्या वेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील,  मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख रामेश्वरजी नाईक तथा हिंद-दि-चादर, समन्वय समिती सदस्य, हिंद-दि-चादर राज्यस्तरीय समन्वय समिती सह अध्यक्ष अॅड. पंडित भाऊ राठोड,  धर्म रक्षक तथा हिंद-दी-चादर, राज्य स्तरीय सम्मन्वय समिती सदस्य किसनभाऊ राठोड,   हिंद-दि-चादर", राज्यस्तरीय समन्वय समिती सह अध्यक्ष श्रीमंत राजे चव्हाण,  सह अध्यक्ष नागपूर विभाग विलास भाऊ राठोड, हिंद-दि-चादर, क्षेत्रिय समिती सदस्य नांदेड डॉ. मोहन चव्हाण,   क्षेत्रीय समिती सदस्य भिकनभाऊ जाधव  जिल्हा क्षेत्रीय समन्वयक सचिनजी वालवेकर तसेच शिख, सिंधी, बंजारा तसेच वाल्मिकी समाजाच्या प्रमुख उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अनुसूचित जातीच्या अत्याचार पिडीतांना संरक्षणाबरोबर न्याय देण्याची प्रशासनाची भूमिका - जिल्हाधिकारी संतोष पाटील
पुढील बातमी
कुष्ठरोग निर्मुलनामध्ये सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल सातारा जिल्ह्याचा सन्मान; राज्य शासनाकडून “महाआरोग्य सन्मान २०२६ पुरस्कार

संबंधित बातम्या