सातारा : अंगापूर (ता. सातारा) गावच्या हद्दीतील कृष्णा नदीत बुडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत महिलेचे नाव रेश्मा संदीप मोरे (वय ३८, रा. सासुर्वे, ता. कोरेगाव) असे आहे. ही घटना दि. २७ डिसेंबर रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रेश्मा मोरे या कृष्णा नदी परिसरात गेल्या असताना पाण्यात बुडाल्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.