सातारा : चुलीच्या भडक्यात एकाचा मृत्यू झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चूलीत टरपेन टाकून चूल पेटवत असताना भडका झाल्याने सतिश भैरु धोंडवड (वय 59, रा. सोनगाव तर्फ सातारा) हे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारावेळी मृत्यू झाला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस नाईक निकम करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
म्हसवे येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या
March 21, 2026
मर्ढेकर यांनी कवितेला नवे परिमाण दिले : डॉ. माने
March 21, 2026
सातारा झेडपीमध्ये ‘डर्टी गेम’
March 21, 2026
घरफोडीच्या तयारीत असलेली टोळी तालुका पोलिसांनी केली जेरबंद
March 19, 2026