सातारा : खंडणी प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'व्यवहारापोटी अजून २० लाख रुपये दिले तर सह्या देणार,' अन्यथा सह्या देणार नसल्याचे सांगून खंडणी मागितल्याप्रकरणी शंकर दत्तात्रय जाधव (रा. कोडोली, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कुमार बाळासाहेब चव्हाण (वय ४३, रा. संभाजीनगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. ६ ऑक्टोबर पोवईनाका येथे घडली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गुरव करीत आहेत.