पिकअप-दुचाकीच्या भीषण अपघातात दोन मित्रांचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 27 April 2025


सातारा : अंबवडे खुर्द ता.सातारा येथे रविवारी सकाळी पिकअप व दुचाकीचा भीषण अपघात होवून दोन 16 वर्षीय मुलांचा मृत्यू झाला. वेदांत शरद शिंदे व प्रज्वल नितीन किर्दत (दोघे रा. अंबवडे खुर्द) अशी ठार झालेल्या मुलांची नावे आहेत. दोन्ही दोस्तांचा अपघातात जीव गेल्याने परिसरात हळहळ होत आहे. दरम्यान, राहूल भरत देवरे (वय 28, रा. सायळी पो.दहिवड ता.सातारा) हा युवक जखमी झाला आहे.

याबाबत सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी सकाळी 11 वाजता हा अपघात झाला आहे. अंबवडे खुर्द येथून पिकअप चालक पांडूरंग विठ्ठल गावडे (वय 42, रा.भेंडवाडी पो.आसनगाव ता.सातारा) हा मार्बल, ग्रानाईड घेवून निघाला होता. दोन्ही वाहने अंबवडे खुर्द आल्यानंतर भीषण अपघात झाला. यावेळी दुचाकीवरील दोन्ही मुले उडून पडली व गंभीर जखमी झाली. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र गंभीर जखमी मुलांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.

पोलिस रात्री उशिरापर्यंत अपघात नेमका कसा झाला? याची माहिती घटनास्थळ, अपघातग्रस्त वाहने, चालक व जखमी कडून घेत होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारमध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या गौरवयात्रेचे स्वागत
पुढील बातमी
साताऱ्यात महाराष्ट्र दिनी 'श्रीमंत योगी' नृत्यनाट्याचे आयोजन

संबंधित बातम्या