राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्या कराड तालुका कार्याध्यक्षपदी सागर लादे

by Team Satara Today | published on : 12 May 2025


कराड : राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्या वर्धापनदिन दिवशी तसेच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली तसेच कराड शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ताशिलदार यांच्या उपस्थितीत सागर लादे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी युवा राज्य फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तसेच इतर मान्यवर व संघटनेचे कराड तालुका अध्यक्ष सचिन भिसे, कराड शहराधक्ष विकी शहा, कराड शहर कार्याध्यक्ष साजिद मुल्ला तसेच संघटनेचे कराड तालुका मार्गदर्शक राकेश पवार, सामाजिक कार्यकर्ते महेश शिंदे, सिद्धेश सोरटे  तसेच अलखैर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मलिक शेख, सामाजिक कार्यकर्ते तोफिक बागवान व संघटनेचे सभासद कार्यकर्ते उपस्थित होते.

 यावेळी बोलताना सागर लादे म्हणाले, संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. तसेच येत्या काही दिवसात संघटना वाढीसाठी मी प्रयत्न करणार आहे. कशा पद्धतीने संघटना समाजाचा तळाशी जाऊन काम करेल याची मी आज सर्व मान्यरांच्या समोर ग्वाही देतो व संघटनेच्या वाढीसाठी इथून पुढे कार्य करत राहणार असे आश्वासन दिले.

यावेळी सागर लादे यांचा सत्कार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महारुद्र तिकुंडे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारमध्ये बौध्द जयंती निमित्ताने रॅली
पुढील बातमी
सुर्ली येथे आमदार केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन

संबंधित बातम्या