कापडगाव हद्दीत अपघातात आयशर-मोटारसायकल धडकेत युवक ठार; दोघे गंभीर जखमी

by Team Satara Today | published on : 11 November 2025


लोणंद : फलटण तालुक्यातील कापडगावच्या हद्दीत मंगळवारी सकाळी भरधाव आयशर ट्रकने मोटारसायकला दिलेल्या भीषण धडकेत रामजतन इंद्रकुमार गौड (वय 23, रा. मॅग्नेशिया कंपनी, लोणंद, मूळ रा. सोनभद्र, उत्तर प्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोणंद-फलटण मार्गावरील बायपास तिकाटणे येथे मंगळवारी सकाळी सुमारे 8.30 वाजण्याच्या सुमारास फलटणकडून पुण्याच्या दिशेने वेगाने निघालेल्या आयशर (एमएच-10-सीक्यू-2426) ट्रकने समोरून आलेल्या ड्रीम युगा मोटारसायकलला (एमएच-45-क्यू-6903) जोराची धडक दिली. या अपघातात मोटारसायकलचालक रामजतन गौड यांचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेले रामसागर आनंदकुमार गौड आणि रवीकुमार गौड हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर आयशरचा चालक पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. याबाबत मनोजकुमार रामलखन गौड (वय 25, रा. मॅग्नेशिया कंपनी, लोणंद) यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार कुंभार तपास करत आहेत. सपोनि भोसले यांनी घटनास्थळी पाहणी केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातार्‍यात नगराध्यपदासाठी 21 जण इच्छुकांचे अर्ज; 368 इच्छुकांची यादी भाजप प्रदेश कार्यालयाकडे रवाना
पुढील बातमी
इलेक्ट्रिक दुचाकीची जिल्हा न्यायाधीशाच्या गाडीला धडक; दुचाकीचालक जखमी

संबंधित बातम्या