विनापरवाना मिरवणूक काढणे आले अंगलट; बोरखळ गावच्या ४ जणांविरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 11 February 2026


सातारा : बोरखळ गावच्या हद्दीत विनापरवाना मिरवणूक काढल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दि ९ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास निलेश बाळासो रसाळ (वय ४०), उत्तम मानसिंग पाटील (वय ६२), अक्षय मोहन पवार (वय ३०,सर्व रा. बोरखळ) आणि मयूर हनुमंत गायकवाड (रा.कोकरळे, ता. खटाव) यांनी कोणत्याही स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासन इतर संबंधित प्रशासकीय परवानगी घेतलेली नाही व स्वतःच्या मर्जीने विनापरवाना साऊंड सिस्टिम लावून विजयी मिरवणूक काढल्याबद्दल चव्हाण विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याची फिर्याद पोलीस हवालदार धनंजय कुंभार यांनी दिली असून अधिक तपास पोलीस नाईक वायदंडे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ईपीएस पेन्शनधारकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन; किमान ९००० पेन्शन देण्याची एकमुखी मागणी
पुढील बातमी
बोरखळ येथे घरात गुलाल टाकल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या