निवृत्त कर्मचाऱ्यांच्या देयकांबाबत विलंब नको : सुनील शिखरे

निवृत्त शिक्षकांना त्यांच्यात सहकाऱ्यांकडून वेदना; पत्राद्वारे टोचले कान

by Team Satara Today | published on : 31 March 2026


सातारा :  आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांची सेवानिवृत्तीनंतर सेवेत असणाऱ्या त्यांच्याच  सहकाऱ्यांकडून कळत नकळत कशी अवहेलना होते यावर सुनील शिखरे यांनी या पत्रात नेमके बोट ठेवले आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांची देयके देण्याबाबत होणारा विलंब त्यांच्या वृद्धावस्थेच्या वेदनांशी निगडित असतो. त्यामुळे यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याचे भावनिक आवाहन त्यांनी एका पत्राद्वारे केले आहे.

यासंदर्भात सुनील शिखरे यांनी जिल्ह्यातील अनुदानित सर्व शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच लिपिक यांना हे पत्र पाठवले आहे. एक अधिकारी म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील माणूस आणि शिक्षण क्षेत्रातील सहकारी म्हणून आपण हे पत्र लिहिले असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

ज्या व्यक्तीने आयुष्यभर शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी रात्रंदिवस कष्ट घेतले, त्या व्यक्तीचे निवृत्तीनंतर पेन्शन, ग्रॅच्युईटी, कमिटेशन व इतर लाभ अनेक महिने प्रलंबित आहेत. तो रोज आशेने शाळेकडे पाहतो, पण त्याच्या फाईलकडे, देयकाकडे दुर्लक्ष होत आहे. त्याच्या डोळ्यातील असहायता, रात्रीची झोप न लागणे, कुटुंबाच्या उदरनिर्वासाठी येणारी चिंता, औषधासाठी पैशाची टंचाई हे सर्व विचार केल्यावर मनाला वेदना होतात अशी साद घालत, माध्यमिक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या लाभाच्या देयकाबाबत तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करा असे आवाहन त्यांनी केले आहे. 

महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम १९८२ नुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सर्व कागदपत्रांची जबाबदारी मुख्याध्यापक व लिपिक यांच्यावरच आहे. तरीही अनेक शाळांमधून या देयकांकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनात येत आहे. ही केवळ प्रशासकीय चूक नाही, तर एका वृद्ध सेवानिवृत्त सहकाऱ्याप्रती होणारा मानवी अन्याय आहे अशा कठोर शब्दात नियम आणि कर्तव्याची सुनील शिखरे यांनी जाणीव करून दिली आहे.

तात्काळ पूर्तता करण्याचे आदेश

एक सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी हा केवळ फाईल किंवा नंबर नाही, तर तो आपला पूर्वीचा सहकारी आहे, जो शाळेच्या उन्नतीसाठी आपल्या आयुष्याचा अमूल्य वेळ देऊन गेला आहे. त्यांना त्याच्या हक्कापासून वंचित ठेवणे हे आपल्या कर्तव्याच्या विरोधात आहे. म्हणून सेवानिवृत्त कर्मचारी देयकापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित देयकाबाबत बँक डिटेल्स शालार्थ ०.२ मधून तात्काळ पाठवून त्याला मान्यता घ्यावी, तपासणी व पूर्तता तात्काळ करावी तसेच सुस्पष्ट आदेश या पत्रातून शिखरे यांनी दिले आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा रुग्णालयात मृतदेहांची पुन्हा अदलाबदल; व्यवस्थापनाबद्दल तीव्र संताप
पुढील बातमी
सातारा जिल्हा परिषदेतील राड्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण नाही; पीओपीच्या कामामुळे यंत्रणा बंद असल्याचे पत्राद्वारे स्पष्ट

संबंधित बातम्या

भीषण स्फोटाने तासवडे एमआयडीसी परिसर हादरला; एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट तासवडे : तासवडे एमआयडीसीमधील (ता. कराड) एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. पहिल्या भीषण स्फोटानंतर आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झालेे. स्फोटाच्या आवाजामुळे एमआयडीसीच्या 10 किलोमीटर परिसरातील गावांतील ग्रामस्थांच्या अक्षरशः कानठळ्या बसल्या. तसेच, परिसरातील गावांमधील घरांना तडे जाण्यासह खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने कंपनी बंद असताना ही दुर्घटना घडली आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. एमआयडी