सातारा : जाती जातींमधल्या भिंती तोडण्यासाठीचा कृती कार्यक्रम म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय आंतरजातीय आंतरधर्मीय वधू- वर सूचक केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या केंद्रामध्ये आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह स्वेच्छेने करणाऱ्या वधू- वरांनी आणि पालकांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन या केंद्राचे राज्य समन्वयक शंकर कणसे, डॉ. ज्ञानदेव सरवदे यांनी केले आहे. गेली अनेक वर्षे समिती आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहाला प्रोत्साहन देत आहे.
येथे साधा संपर्क
आंतरजातीय, धर्मीय, तसेच विधवा- विधूर अशा विवाह करू इच्छिणाऱ्यांनी या केंद्राचे समन्वयक शंकर कणसे (मु. पो. पिंपरी, ता. कोरेगाव, जि. सातारा, मोबाईल क्र. ९९२२३ ५५४३५), डॉ. ज्ञानदेव सरवदे (बारामती, मोबाईल क्र. ९५२७७२१४७५) यांच्याशी संपर्क साधून माहिती पाठवावी.