जिल्हा परिषदेच्या मैदानात नागरिकांची स्वयंस्फूर्तीने विशेष स्वच्छता मोहीम; धनंजय जांभळे, धनंजय कदम, राहुल साबळे, रवी पवार यांचा पुढाकार

by Team Satara Today | published on : 13 February 2026


सातारा  : जिल्हा परिषद ग्राउंड परिसरातील वाढता कचरा, दारूच्या बाटल्या व प्लास्टिक कचऱ्यामुळे अस्वच्छता निर्माण झाली होती. याची दखल घेत आज सकाळी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमध्ये सुमारे 100 हून अधिक नागरिक सहभागी झाली होते. सर्व मैदान परिसर स्वच्छ करण्यात सातत्याने अशी स्वच्छता मोहीम जिल्हा परिषदेने राबवावी, अशी अपेक्षा पालिकेचे नगरसेवक रवी पवार यांनी व्यक्त केली.

रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक कचरा व खरकटे गोळा

रुद्र अकॅडमीचे जाधव यांच्या सहकार्याने आरोग्य सभापती धनंजय जांभळे , सामाजिक कार्यकर्ते धनंजय कदम, राहुल साबळे तसेच नगरसेवक रवी पवार यांच्या पुढाकारातून ही मोहीम पार पडली. सकाळी ६ ते ९ या वेळेत ग्राउंड लेव्हलवर प्रत्यक्ष साफसफाईचे काम करण्यात आले. दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक कचरा व इतर खरखटे गोळा करून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.

यावेळी प्रभाग १६ विसावा-कल्याणी येथील मुकादम चंद्रभान चव्हाण व त्यांची टीम उपस्थित होती. तसेच झेडपी ग्राउंड मॉर्निंग ग्रुपचे सदस्यही या उपक्रमात सहभागी झाले होते. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये व स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी 22 फेब्रुवारी रोजी संपर्क अभियानाचे आयोजन
पुढील बातमी
शिवसेना व धनुष्यबाण घराघरात पोहचलेय आता ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सर्वत्र भगवा फडकला पाहिजे -सौ. रेश्मा जगताप

संबंधित बातम्या