सातारा : १४ डिसेंबर ते 2४ डिसेंबर २०२५ सातारा जिल्ह्यातील पुसेगाव, ता. खटाव येथील श्री सेवागिरी महाराज यात्रा साजरी होत आहे. यात्रेच्या निमित्ताने श्री सेवागिरी महाराज रथ मिरवणूक, झेंडा मिरवणूक, हॉलीबॉल स्पर्धा, बैलगाडी शर्यत, कुस्ती स्पर्धा, कृषी प्रदर्शन, बैलबाजार, युवा महोत्सव, कब्बडी स्पर्धा, श्वान स्पर्धा, जनावरांचे प्रदर्शन इत्यादी आयोजित केली जाणार आहेत.
अशा सर्व प्रसंगी गर्दी व अडथळा होऊ न देणे, ढोल, ताशे इतर वाद्ये वाजविण्याचे विनियमन करुन नियंत्रण ठेवणे ध्वनी प्रदुषणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निबंधाचे पालन होवून लाऊड स्पिकरचा वापर योग्य प्रकारे व्हावा, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक निर्बंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम २०१४ चे कलम ३६ नुसार दि. १४ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीकरीता कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तासाठी नेमलेल्या सर्व संबंधीत पोलीस अधिकारी व वरीष्ठ पोलीस अधिकारी यांना आवश्यक ते अधिकार प्रदान केले आहेत.