09:41pm | Jun 08, 2024 |
सातारा : सातारा पालिकेने सातारा शहराच्या परिसरात वर्दळीच्या रस्त्यावर असणारे आणि वाहतुकीला अडथळे ठरणारे 22 फलक कारवाई करून काढून टाकले. शनिवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा पालिकेच्या शहर विकास विभागाने उसंत न घेता ही कारवाई चालू ठेवली. पोवई नाका ते जिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय ते कूपर बंगला यादरम्यान दीड तास झालेल्या कारवाईत फलक जप्त करण्यात आले.
सातारा पालिकेने वाहतुकीच्या दृष्टीने अडथळे ठरणारे होर्डिंग, रस्त्यात लक्ष वेधणारे जाहिरात फलक यांना लक्ष केले आहे. वाहतूक विभागाने दोनच दिवसापूर्वी खण आळी आणि व्यापारी पेठेमध्ये वाहतुकीला अडथळा ठेवणारे लोखंडी जाळ्या आणि तेथील छोटे-मोठे विक्रेते यांच्या साहित्य जप्त करून जणू पालिकेला धडा घालून दिला होता. पालिकेने शनिवारी अचानक अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करून थेट कारवाईला सुरुवात केली. पालिका अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम आणि पाच कर्मचारी यांनी एक डंपर घेऊन पोवई नाका, सेंट पॉल हायस्कूल, जिल्हा रुग्णालय परिसर, मुथा चौक, कूपर बंगला, जिल्हा रुग्णालय पिछाडी ते अजिंक्य हॉस्पिटल चौकापर्यंत वाहतुकीला अडथळे ठरणारे आणि परिसराचे विद्रूपीकरण करणारे बावीस फलक हटवले.
या कारवाई संदर्भात बोलताना प्रशांत निकम म्हणाले, जिल्हाधिकार्यांच्या सूचनेप्रमाणे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सातारा शहराचे विद्रूपीकरण आणि मोकळ्या जागे मधील अतिक्रमण तातडीने काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे व्यापारी, नागरिक यांनी वाहतुकीला अडथळा होणार नाही या संदर्भात सहकार्य करावे. यापुढेही मोहीम अशीच सुरु राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॅफे मालकावर गुन्हा |
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |