सातारा : बनावट तणनाशक औषध विकून शेतकर्यांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बनावट तणनाशक औषध विक्री केल्याप्रकरणी धैर्यशील अनिल घाडगे (वय 31, रा.सातारा) याच्या विरुध्द सतिश तानाजी पिसाळ (वय 33, रा.नाशिक) यांनी तक्रार दिली आहे. ही कारवाई करंजे नाका, सातारा येथील घाडगे ट्रेडर्स कृषी सेवा येथे करण्यात आली आहे. बनावट तणनाशक विकून कंपनीची व शेतकर्यांची फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.