सातारा : हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कार्यकारी दंडाधिकारी यांनी हद्दपार आदेश केले असताना त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी विलास उर्फ यल्ला शरणाप्पा कुरुमणी रा. आंबेडकर भवन शेजारी सातारा, शुभंकर बाळकृष्ण जाधव रा. महागाव सातारा, रोहित प्रकाश जाधव रा. कोडोली सातारा, अक्षय बबन कीर्तीकुडव रा. कोडोली सातारा, महेश जालिंदर माने रा. चंदन नगर कोडोली सातारा, प्रल्हाद शिवाजी पवार रा. अजंठा चौक सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 15 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा