03:47pm | Dec 04, 2024 |
सातारा : सातारा येथील शिवछत्रपतींच्या घराण्यातील व्यक्तीला मंत्रीपद द्यावे, अन्यथा वीजवाहक टॉवरवरुन उडी मारुन आपले जीवन संपवेन, अशी धमकी देणार्या होमगार्ड मध्ये जवान असणार्या एका तरुणाने आपला व्हिडिओ व्हायरल करीत एकच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर ही घटना खा. उदयनराजेंना समजताच त्यांनी संबंधित तरुणाशी मोबाईलवरुन संपर्क करुन त्याचे समुपदेशन करीत त्याला आत्महत्त्या करण्यापासून परावृत्त केले.
याबाबत माहिती अशी की, सदाशिव ढाकणे रा. राजूर गणपती, जि. जालना येथील होमगार्ड असणार्या तरुणाने आज सकाळी हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणार्या एका वीजवाहक टॉवर वर चढत सातारा येथील शिवछत्रपती घराण्यातील वंशजांना होऊ घातलेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्रीपद द्यावे, चार तासांत याबाबतचा निर्णय मला कळवावा; अन्यथा मी या टॉवरवरुन उडी मारुन आपली जीवन संपवेन, असा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करीत संबंधित युवकाने खळबळ उडवून दिली होती. त्याला वाचविण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांसह स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारीही खाली जमून त्यांनी उडी मारु नकोस, अशा विनंत्या केल्या होत्या. परंतू तरीही तो आपल्या निर्णयापासून परावृत्त होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांच्या मार्फत खा. उदयनराजेंपर्यंत हा सगळा प्रकार कळविण्यात आला. त्यानंतर खा. उदयनराजेंनी स्वत:च्या भ्रमणध्वनीवरुन संबंधित तरुणास फोन करुन त्याला उडी मारण्यापासून परावृत्त केले. यावेळी शिवछत्रपतींचे विचारही समजावून सांगितले. तसेच तुमच्यावर तुमच्या कुटूंबाची जबाबदारी आहे, याचीही जाणीव करुन दिली. तसेच येणार्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये सातारच्या राजघराण्यातील व्यक्तीचा निश्चितपणे समावेश केला जाईल, याचीही हमी दिली.
खा. उदयनराजेंच्या एका फोनमुळे आत्महत्त्या करणारा तरुण आपल्या निर्णयापासून परावृत्त झाला. संबंधित तरुणाची ‘ती क्लीप’ व्हायरल झाल्यानंतर तरुणाला समजून घालणारी खा. उदयनराजेंचीही क्लीपही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, मुंबईमध्ये भाजपच्या गटनेतेपदी तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर झाल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याने या मंत्रीमंडळामध्ये खा. उदयनराजे यांचे चुलतबंधू आ. शिवेंद्रराजे भोसले यांचाही समावेश होणार असल्याचे संकेत भाजप हायकमांडकडून दिले गेल्याने सातार्यामध्ये भाजपा तसेच दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
लक्ष वेधण्यासाठी स्टंटबाजी?
हल्ली सोशल मीडियाच्या अतीवापरामुळे सगळीकडे स्टंटबाजीचे पीक उदंड माजलेले आहे. कोण, कधी, कसली मागणी करेल, याचा नेम राहिलेला नाही. प्रसिद्धीसाठी फोन उचलायचा, नको ती मागणी करायची आणि त्याद्वारे प्रशासनासह स्वत:च्या परिवाराला वेठीस धरायचे, असे प्रकार हल्ली वाढलेले आहेत. स्वत:च्या शरीराला दुखापत करुन घ्यायची आणि त्याद्वारे आपल्या अवास्तव आणि अनैतिक मागण्या मान्य करुन घ्यायच्या, असे प्रकार यापूर्वी उघडकीस आलेले आहेत. आज राजूर गणपती, जि. जालना येथे घडलेला प्रकारही याच पठडीतला असावा. भविष्यात अशा स्टंटबाजांना रोखण्यासाठी अशांकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. अन्यथा ‘विनाकारण प्रशासन वेठीस, नाहीतर राजकीय पुढारी भेटीस’, या पायंड्यामुळे लोकांचे मात्र मनोरंजन होत आहे.
प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी |
साताऱ्यात दि. २६ रोजी जयपूर फूट शिबिराचे आयोजन |
थोरले प्रतापसिंह हे काळाच्याही पुढे असणारे प्रजाहितदक्ष राजे होते |
संघर्षशील एन.डी. सरांना कृतिशील राहून आवाज उठवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल |
जीवन परिवर्तनात पुस्तकांची भूमिका मोलाची |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
‘मानिनी जत्रा’ सारखे उपक्रम बचतगटांसाठी नवसंजीवनी |
आई, मी 1000 सूर्यनमस्कार पुर्ण केले..!’ |
डिजिटल नकाशे म्हणजे मालमत्तेचे वैध पुरावे |
जिल्ह्यात पुन्हा एकदा ''शंभूराज" |