सातारा : सदर बाजार येथे कूपर कॉलनी प्राची प्राईडमध्ये राहणाऱ्या ऋतुजा अक्षय जाधव (वय २८) यांना पती,सासू-सासरे,पतीचे मामा व पतीच्या काकांकडून जाचहाट केल्याची घटना सप्टेंबर २०२३ ते ३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडली आहे.
अक्षय संजय जाधव सासू अनिता संजय जाधव सासरे संजय जाधव मामा राहुल वायकर आणि काका माणिक जाधव यांनी संगमने ऋतुजा यांना पैशाची व सोन्याची मागणी करत तू व तुझ्या घरच्यांनी आम्हाला फसवले आहे. असे म्हणून हाताने मारहाण करत शिवीगाळ आणि दमदाटी केली आहे. तसेच फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याने ५ जणांविरोधात जाचहाट केल्या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पवार करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.