सातारा : एकीकडे उन्हाचा पारा चढत असतानाच सध्या फळ बाजारात हापूस आंब्याची रेलचेल झाली आहे. त्यातच सातारा शहरातील राजवाडा परिसरातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह भाजी मंडई मध्ये लोणच्याच्या विविध जातीच्या हिरव्यागार कैऱ्या मोठ्या प्रमाणात विक्रीस आल्या आहेत.
रायवळ, तोतापुरी, गावठी, छोट्या कैऱ्यांसह लोणच्यासाठी खास आंबट पांढऱ्या बाठीच्या कैऱ्या या विक्रेत्यांकडून जागेवर ग्राहकांना फोडूनही दिल्या जात आहेत. कैरीचे वर्षभरासाठी लोणचे घालण्यासाठी आता महिलांनी कंबर कसली असून या लोणच्याच्या कैरी खरेदीसाठी महिलांची विशेष गर्दी होत आहे.