मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण : पीएम मोदी

१० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन

by Team Satara Today | published on : 10 October 2024


मुंबई : वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासासाठी मातृभाषेत पुस्तके उपलब्ध नव्हती, परंतु केंद्र सरकारने ही कमतरता दूर केली आहे. आता महाराष्ट्रातील युवकांनाही मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण घेता येईल आणि आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे आपले स्वप्न ते पूर्ण करतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केला.

केंद्रीय वैद्यकीय आयोगाने मंजुरी दिलेल्या राज्यातील १० वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन आणि नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो धावपट्टी व टर्मिनल इमारतीचे तसेच शिर्डी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन बुधवारी पंतप्रधान मोदी यांनी केले.

कुठे असतील ही महाविद्यालये? ठाणे, मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशीम, अमरावती, भंडारा, गडचिरोली. आज आपण केवळ इमारती बांधत नाही, तर निरोगी आणि समृद्ध महाराष्ट्राचा पाया रचत आहोत. लाखो लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्यात १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली आहेत. यामुळे महाराष्ट्रात आणखी ९०० वैद्यकीय जागा निर्माण होतील. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बोरणे घाटात कचर्‍यांचे ढिगारे!
पुढील बातमी
मोठ्या स्वप्नांना परिश्रमाची जोड द्या, समर्थ भारत घडवा

संबंधित बातम्या