सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कार्यक्षेत्रात असणाऱ्या जावळी तालुक्यातील सावरी येथे कोट्यवधी रुपयांचा अंमली पदार्थाचा कच्च्या मालाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचच्या पथकाने ( युनिट 7) यांनी ओंकार दिघे या इसमाला ताब्यात घेतले आहे. गोविंद शिंदवडे यांच्या शेतातील एका शेडमध्ये सेंटेंड हुक्का बनवण्याची थाप मारून ते भाड्याने घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई पोलिसांनी क्राईम ब्रँचचे युनि युनिट 7 चे पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. अत्यंत गोपनीयतेने याबाबतची कारवाई केली असून सातारा पोलीस यंत्रणा या निमित्ताने अलर्ट मोडवर आली आहे. या शेडमध्ये एमडीचे ५ लिटर कच्चे द्रावण व इतर साहित्य आढळून आले आहे. होता याबाबत अत्यंत सावध पावले टाकली जात आहेत. याप्रकरणी दिघेसह अन्य तीन अशा चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या सूचनेनंतर सातारा पोलिसांचे एक पथक उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांच्या नेतृत्व अंतर्गत घटनास्थळी रावांना झाल्याची माहिती आहे.
जावळीतल्या सावळीत एमडी ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश सावरी गावात मुंबई क्राईम ब्रँचचा मोठा छापा सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात सावळी (सावरी) गावात मुंबई क्राईम ब्रँचचा मोठा छापा टाकण्यात आला आहे. एका शेडमध्ये एमडी ड्रग्स तयार होत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजन करून छापा टाकला असता एमडी चा कच्चा माल ताब्यात घेण्यात आला . शिंदवडे यांच्या शेतातील शेड दिघे यांने आठवड्यापूर्वीच भाड्याने घेतले होते . मुंबईत चालणाऱ्या हुक्का पार्लरमध्ये सेंटेड हुक्का बनवण्यासाठी ही जागा हवी असल्याची लोणकढी थाप जागामालकाला मारण्यात आली होती. आता मुंबई पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अधिकृत माहितीची येईपर्यंत काही सांगता येत नाही या मध्ये राजकीय वरद हस्त आहे याबाबतचा तपास केला जात आहे
बामणोली दरे सावरी ही जावली तालुक्यातील संवेदनशील क्षेत्रात येणारी गावे असून पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत प्रगल्भ आहेत शासकीय प्रोटोकॉलच्या निमित्ताने शासकीय यंत्रणांची येथून सातत्याने ये जा असते असे असताना देखील बामणोलीपासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सावरी येथे इतक्या मोठ्या प्रमाणावर एमडीचा कच्चा माल आढळावा व याचा कोणालाही थांगपत्ता लागू नये याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांकडे कसून चौकशी सुरू केली आहे.