सातारा : तालुका पोलिसांनी तीन जुगार अड्यावर छापा टाकून तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत.
तासगाव (ता. सातारा) येथील जुगार अड्यावर केलेल्या कारवाई प्रकरणी किशोर गणेश काटे (रा. तासगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा सुमारे ९०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. हवालदार शिखरे तपास करत आहेत. मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्याप्रकरणी परशुराम उत्तम जाधव (रा. रविवार पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा सुमारे ७२० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. हवालदार पारडे यांनी ही कारवाई केली आहे. तिसरी कारवाई लिंब (ता. सातारा) हद्दीत करण्यात आली. याप्रकरणी अतिश सतिश खंडझोडे (रा. बुधवार पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा सुमारे एक हजार १२० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. हवालदार पांडव यांनी ही कारवाई केली आहे.
शाहुपुरी पोलिसांचा जुगार अड्ड्यांवर छापा
सातारा : शाहूपुरी पोलिसांनी दोन जुगार अड्यावर छापा टाकून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्यावर छापा टाकून निलेश गुलाबराव शिंदे (रा. शनिवार पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा सुमारे ८५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. हवालदार बाजारे तपास करत आहेत.