सातारा : कुत्र्याने घरासमोर घाण केल्याचा जाब विचाराचा राग येऊन विनीत येवले (रा. 442 शनिवार पेठ, सातारा) याने फिर्यादी महिलेचा विनयभंग करून तिच्या चुलत दिराला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित महिलेच्या सुनेने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विनीत विजय येवले, प्रतीक्षा विजय येवले, विद्या विजय येवले, विजय सोपान येवले या चौघांवर विनयभंगासह इतरांना दुखापत करण्याचा गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणांमध्ये फिर्यादीचे चुलत दीर अमित चिकणे याला विजय येवले याने धारदार हत्याराने हातावर वार करून जखमी केले तसेच आरोपीच्या इतर सदस्यांनी सुद्धा फिर्यादी आणि त्यांच्या घरातील सदस्यांना वेळोवेळी शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी पोलीस हवालदार सुडके अधिक तपास करत आहेत.