ऑपरेशन सिंदूरमध्ये मोठी जीवितहानी

पाक चा युद्धविरामासाठी आटापिटा

by Team Satara Today | published on : 28 May 2025


नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर न्यायासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले. ऑपरेशन सिंदूरने पाकड्यांचे कंबरडे मोडले. बहावलपूरपासून ते मुरिदकेपर्यंत दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त झाले. त्यानंतर पाकिस्ताने भारताच्या रहिवाशी ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ला केला. चौथ्याच दिवशी भारताच्या माऱ्यापुढे पाकिस्तान झुकला. त्याने युद्धविरामासाठी गुडघे टेकवले. आता या युद्धविरामाविषयी नवीन खुलासा समोर आला आहे. तर मृतांचा आकडा सुद्धा वाढल्याचे समोर आले आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, भारताने युद्धविराम करण्यासाठी एकदा नाही तर दोनदा भारताशी संपर्क साधला होता. पाकिस्तानने पहिल्यांदा 7 मे रोजी संध्याकाळी भारतासोबत युद्धबंदीसाठी संपर्क केला होता. पाकिस्तानच्या लष्करी देखरेख,ऑपरेशन्सचे महासंचालकांनी भारताशी संपर्क साधला होता. 7 मे रोजीच भारतीय लष्करी कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाण्यांवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर 10 मे रोजी 3.35 मिनिटांनी डीजीएमओ स्तरावर चर्चेला सुरुवात झाली. त्यावर दोन्ही देशांनी युद्धविरामावर सहमती दिली. दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी ही सैन्य दलातील संपर्क माध्यमाद्वारे ही चर्चा झाली. यापूर्वी सुद्धा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी पत्र परिषदेत याविषयीचा उल्लेख केला होता. पाकिस्तानच्या डीजीएमओने युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवल्याचे ते म्हणाले होते.

ऑपेरशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमध्ये मयताचा आकडा वाढला आहे. आता 160 जण भारताच्या हल्ल्यात ठार झाल्याचे समोर आले आहे. बहावलपूर येथील हल्ल्यात 20 हून अधिक जण ठार झाले. त्यातील मरणारे हे दहशतवादी मसूद अझहरचे नातेवाईक होते. भारताच्या या कारवाईत पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी आणि सैनिक मिळून 40 जण ठार झाले आहेत. पाकिस्तान हा आकडा 11 सांगत आहे.

पाकिस्तानच्या पायाभूत सुविधांना मोठा फटका बसला आहे. एअरस्पेस आणि विमानतळ बंद असल्याने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची गती एकदम मंदावली. एका अंदाजानुसार, या सर्व कारावाईत पाकिस्तानला अनेक अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नुकसान झाल्याचे कबूल केले आहे. अर्थात अजून अधिकृत आकडेवारी जाहीर केली नाही.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एकाच कुटुंबातील सात सदस्यांची आत्महत्या
पुढील बातमी
पावसाच्या दिवसात त्रासदायक ठरते कानात इन्फेक्शनची समस्या

संबंधित बातम्या