पुणे : अमरावतीतील सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्यावर पिस्तुलातून गोळी झाडून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना बालेवाडी भागात घडली. पत्नी आणि पुतण्याचा खून करून सहायक पोलीस आयुक्त गायकवाड यांनी स्वत:वर केली. या घटनेत सहायक आयुक्त गायकवाड यांची पत्नी मोनी गायकवाड (वय ४४) आणि पुतण्या दीपक गायकवाड (वय ३४) यांचा मृत्यू झाला आहे. सहायक आयुक्त गायकवाड अमरावतीतील राजपेठ विभागात सहायक पोलीस आयुक्त आहेत. शनिवारी सुट्टी असल्याने ते पुण्यात आले होते. पुण्यात बालेवाडी भागात गायकवाड, त्यांची पत्नी, दोन मुले आणि पुतण्या राहायला होते. रविवारी मध्यरात्री गायकवाड यांनी पत्नी मोनी आणि पुतण्या दीपक यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी स्वत:वर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. गायकवाड यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गायकवाड यांच्याकडे असलेले पिस्तूल जप्त केले आहे. गायकवाड यांनी खासगी वापरासाठी पिस्तूल घेतले होते. त्यांच्याकडे शस्त्र परवाना असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याचा खून का केला? याबाबतची माहिती मिळू शकली नाही. चतु:शृंगी पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
पत्नी आणि पुतण्याचा खून करून सहायक पोलीस आयुक्ताची गोळी झाडून आत्महत्या
by Team Satara Today | published on : 24 July 2023
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
ड्राय डे नावाला, पार्सल मिळतंय भावाला
December 02, 2025
सातारा जिल्हा न्यायालयासमोर रुग्णवाहिका आणि एसटी बसची समोरासमोर धडक
December 01, 2025
जिल्ह्यात हुडहुडी.....; सातारा गारठला, रविवारी रात्रीपासून थंडीचा जोर
December 01, 2025
हाच खरा मर्दांचा खेळ, निवडणुका तर तृतीयपंथीही लढवतात
December 01, 2025
राजापुरी येथे ६० हजार रुपये किंमतीच्या केबलची चोरी
November 30, 2025
नेले-किडगावमध्ये जुन्या भांडणावरून एकाला मारहाण
November 30, 2025
सातार्यातील बॉम्बे रेस्टॉरंट येथे पोलिसांना सापडली कारमध्ये तलवार
November 30, 2025
सातारा-रहिमतपूर रस्त्यावरील दत्तनगर कॅनॉलजवळ कारची फळ स्टॉलला धडक
November 30, 2025