सातारा : विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केतकी सागर माने (वय ३१, रा. विसावा नाका, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पती सागर शिवाजी माने, सासू गोदाबाई माने व सासरे शिवाजी शंकर माने (सर्व रा. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांनी माहेरहून फ्लॅट व दुचाकी आणण्यासाठी सतत जाचहाट केला. मे २०२० पासून वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून पोलिस तपास सुरू आहे.