आयकर विभागाची संजीवराजे यांच्या घरी धाड

by Team Satara Today | published on : 05 February 2025


सातारा : विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आज आयकर विभागाची चौकशी चालू आहे. संजीवराजे आणि रघुनाथराजे निंबाळकर यांचे निवास्थान असलेल्या जय व्हिला आणि सरोज व्हिला याठिकाणी आज सकाळी ६ वाजता आयकर विभागाची पथके दाखल झाली. याचबरोबर त्यांच्या डेअरीवरही अधिकारी पोहोचल्याची माहिती मिळत आहे. सकाळपासून या ठिकाणी संजीवराजे यांची चौकशी या आयकर विभागाच्या पथकाकडून करण्यात येत आहे. 

रामराजे हे सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत विधानपरिषदेचे आमदार आहेत तर संजीवराजे आणि रघुनाथराजे यांनी आताच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटात प्रवेश केला होता. परंतु सध्या संजीवराजे हे पुन्हा अजितदादांच्या गटात प्रवरेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच आज आयकर विभागाने टाकलेल्या या छाप्याने सध्या जिल्ह्यात खळबळ माजली आहे. सध्या संजीवराजे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली असून याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे डिजिटल स्वरुपात 'डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ' सुरू करणार !
पुढील बातमी
जिल्हा बँकेने शेतक-यांसाठी राबविलेल्या चारचाकी वाहन कर्ज योजनेचा लाभ घ्यावा : डॉ. राजेंद्र सरकाळे

संबंधित बातम्या