सातारा : सातारा जिल्ह्याची अर्थ वाहिनी व सर्व सामान्यांची बँक असा नावलौकिक प्राप्त असलेल्या जनता सहकारी बँकेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार बँकेच्या स्थापनेपासून प्रथमच ६२ वर्षाने सातारा जिल्ह्याच्या सीमेपार होणार आहे .त्यास रिझर्व्ह बँक इंडियाची परवानगी नुकतीच प्राप्त झाली. अशी माहिती बँकेचे भागधारक पॅनेल प्रमुख, जेष्ठ संचालक व बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन श्री. विनोद कुलकर्णी यांनी दिली.
जनता सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक जून २०२३ मध्ये पार पडली. भागधारक पॅनेलच्या वतीने पॅनेल प्रमुख यांनी निवडणुकीतील जाहीरनाम्यात, “जनता बँक वाचवली, टिकवली व आतावाढविणे” असा शब्द सभासदांना दिला होता. त्याप्रमाणे पूर्वीचे मंजूर कार्यक्षेत्र सातारा जिल्ह्याबरोबरच संपूर्ण पुणे जिल्हा कार्यक्षेत्र करण्यासाठी सहकार आयुक्त व रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाकडे वारंवारपाठपुरावा केला. सदर प्रस्तावास नुकतीच रिझर्व्ह बँकने मंजुरी कळविली असून मा. सहकार आयुक्त यांनी यापूर्वीच मंजुरी दिलेली आहे, त्यामुळे येत्या वर्ष भरात जनता सहकारी बँकेची शाखा पुणे जिल्ह्यात सुरु होणार असल्याची माहिती दिली.
चेअरमन श्री. अमोल मोहिते यांनी गेली दोन वर्षे बँकेचा कारभार सर्व संचालक सदस्यांच्या सहकार्याने अत्यंत गतिमान व पारदर्शकपणे करून बँक आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम केलेली आहे. बँकेने सलग दोन आर्थिक वर्षे रिझर्व्ह बँकेचे आर्थिकदृष्ट्या सक्षम व उत्तम व्यवस्थापनाचे सर्व निकष पूर्ण केलेले आहेत. तसेच एन. पी. ए. संकल्पना लागू झाल्यापासून प्रथमच बँकेकडील एन.पी.ए. चे प्रमाण शून्य टक्के राखण्यास संचालक मंडळास यश आलेले आहे. नजीकच्या काळात बँकेच्या ग्राहकांना आपल्या हक्काच्या बँकेतून मोबाईल बँकिंग सेवा देखील उपलब्ध होणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव देखील अंतिम मंजुरीसाठी रिझर्व्ह बँकेकडे प्रलंबित आहे अशी माहिती त्यांनी दिली. बँकेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांनी बँकेवर प्रचंड विश्वास दाखविला असून, बँकेच्या यशस्वी वाटचालीत त्यांची अत्यंत मोलाची व खंबीर साथ लाभली आहे. त्याचप्रमाणे बँकेचे सर्व अधिकारी व सेवक वर्ग यांचाही मोलाचा वाटा असल्याचे नमूद केले.
यावेळी बँकेचे चेअरमन अमोल मोहिते, व्हा. चेअरमन विजय बडेकर, जेष्ठ संचालिका डॉ. चेतना माजगांवकर, जयवंत भोसले, जयेंद्र चव्हाण, आनंदराव कणसे, अशोक मोने, माधव सारडा, सौ. सुजाताराजेमहाडिक, चंद्रशेखर घोडके, अविनाश बाचल, रविंद्र माने, रामचंद्र साठे, वसंत लेवे, बाळासाहेब गोसावी,वजीर नदाफ, नारायण लोहार, अॅड. चंद्रकांत बेबले, अक्षय गवळी, मच्छिंद्र जगदाळे, तज्ञ संचालक सौरभरायरीकर (सी.ए.), राजेंद्र जाधव (सी.ए.)., सेवक संचालक निळकंठ सुर्ले, शिवाजीराव भोसले, तसेच बोर्डऑफ मॅनेजमेंटचे सदस्य विनय नागर (टॅक्स कंन्सलटंट), पंकज भोसले (सी.ए.), ॲड. श्रुती कदम, जनता बँक कर्मचारी संघाचे अध्यक्ष उमेश साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार, अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होते. सातारच्या जनता सहकारी बँकेच्या आगमनाने पुणे जिल्ह्यातील सातारकरांना बँकिंग सेवा अधिक सुलभ रित्या पार पडणार आहे त्यामुळे ग्राहक वर्गामध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.