कराड : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे निवडणुकीतील यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. या यशानंतर डॉ.अतुलबाबा यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी डॉ. भोसले यांचा सत्कार करत अभिनंदन केले.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. या मतदारसंघात आतापर्यंत केवळ तीनच लोकप्रतिनिधींनी प्रतिनिधित्व केले असून, हे तिघेही लोकप्रतिनिधी काँग्रेसचे मातब्बर नेते राहिले आहेत. यापैकी गेल्या 10 वर्षांपासून या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार म्हणून कार्यरत होते. त्यांचा या निवडणुकीत भाजपा-महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी 39,355 मतांनी पराभव करत देदीप्यमान विजय संपादन केला.
या ऐतिहासिक विजयात कराड दक्षिणमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलविण्यात यशस्वी झालेल्या डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यावर राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. दरम्यान, आज मुंबईत नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी ना. देवेंद्र फडणवीस यांची सागर या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ना. फडणवीस यांनी डॉ. अतुलबाबा भोसले यांचा या शानदार विजयाबद्दल विशेष सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे आणि भाजपचे नेते, देशाचे पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी, गृहमंत्री ना. अमित शहा, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्वच पक्षश्रेष्ठींच्या भक्कम पाठबळामुळे, महायुतीतील भाजपसह सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांच्या अविरत परिश्रमामुळे हे यश संपादन करता आल्याचे सांगितले.
प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी |
साताऱ्यात दि. २६ रोजी जयपूर फूट शिबिराचे आयोजन |
थोरले प्रतापसिंह हे काळाच्याही पुढे असणारे प्रजाहितदक्ष राजे होते |
संघर्षशील एन.डी. सरांना कृतिशील राहून आवाज उठवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल |
जीवन परिवर्तनात पुस्तकांची भूमिका मोलाची |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
‘मानिनी जत्रा’ सारखे उपक्रम बचतगटांसाठी नवसंजीवनी |
आई, मी 1000 सूर्यनमस्कार पुर्ण केले..!’ |
डिजिटल नकाशे म्हणजे मालमत्तेचे वैध पुरावे |
जिल्ह्यात पुन्हा एकदा ''शंभूराज" |