सातारा : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागमार्फत राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणा-या एमएसएमई क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार, स्वयंरोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यासाठी तसेच उद्योगाच्या विकासाकरीता राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग त्यांचे उपक्रम व योजना संचालनालयामार्फत राज्यात राबवत आहेत. सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संबंधित सर्व विभागांच्या सहकार्याने 15 जानेवारी रोजी एक दिवसीय कार्यशाळा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, सदरबाझार, सातारा येथे आयोजन करण्यात आले आहे.
एमएसएमई क्षेत्रासंदर्भातीलसंबंधित अधिकारी, तसेच जिल्हा अग्रणी व्यवस्थापक, आयात व निर्यात क्षेत्रातील अनुभवी प्रवक्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. कार्यशाळेसाठी सुक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम घटक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक यांनी उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सातारा, एमआयडीसी वसाहत फुलोरा हॉटेल जवळ, जुनी एमआयडीसी, सातारा दूरध्वनी क्रमांक ०२५६२-२४४६५५, ई-मेल आयडी didic.satara@maharashtra.gov.in येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेश दंडगव्हाळ यांनी केले आहे.