सातारा : सातारा-रहिमतपूर रस्त्यावरील शहरालगत असलेल्या दत्तनगर कॅनॉलजवळ २९ नोव्हेबर रोजी अपघात झाली. भरधाव कारने दुचाकी व फळ स्टॉलला धडक दिल्याने नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये काेणी जखमी झाले नाही. याप्रकरणी श्रीकांत मधुकर पवार (वय ४२, रा. कोडोली, सातारा) यांनी विक्रम दिलीप माळी (रा. कडेगाव, जि.सांगली) यांच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सातारा-रहिमतपूर रस्त्यावरील दत्तनगर कॅनॉलजवळ कारची फळ स्टॉलला धडक
by Team Satara Today | published on : 30 November 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा