फलटण : फलटण ग्रामीण पोलिसांनी ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारेची चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आधीत मध्यरात्रीच्या सुमारास पाच जण संशोधन त्या फिरताना आढळून आले होते त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारेची चोरी केल्याची कबुली दिली आहे.
याप्रकरणी संतोष जगन्नाथ घाडगे, किरण भिमराव घाडगे, सागर युवराज घाडगे, प्रशांत सुनील जुवेकर सर्व रा. मलटण, ता. फलटण आणि रोहिदास सोपान कदम रा. चौधरवाडी, ता. फलटण अशी ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.
हे पाच जण रात्री संशयितरित्या फलटण ग्रामीण पोलिसांना आढळून आले असता त्यांच्याकडे अधिक तपास केल्यानंतर त्यांनी काही ट्रान्सफॉर्मरची चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून गॅस सिलेंडर व तांब्याच्या ताराही जप्त करण्यात आलेल्या आहेत. संबंधितांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने, महादेव पिसे, नितीन चतुरे, तात्या कदम, अमोल जगदाळे, हनुमंत दडस यांनी सहभाग घेतला.