सातारा तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

by Team Satara Today | published on : 05 April 2026


सातारा  : सातारा तालुक्यातील एका गावातून १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

अज्ञात व्यक्तींनी फूस लावून मुलीला पळवून नेल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसांत दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यातील दिव्यनगरीत देहविक्री अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तीन महिलांची सुटका, दोन जणांवर गुन्हा
पुढील बातमी
सातारा शहरातील तांदूळआळी परिसरात दोन वाईन शॉप फोडून ८ लाखांवर डल्ला

संबंधित बातम्या