सोनगाव फाटा येथे बारा हजारांची घरफोडी

by Team Satara Today | published on : 28 May 2025


सातारा : सोनगाव फाटा येथे अज्ञात चोरट्यांनी बारा हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 ते 26 दरम्यान मोहन गोपाळ राऊत रा. सोनगाव, ता. सातारा यांच्या सोनगाव फाटा येथील हॉटेल आकाश स्नॅक्स सेंटरच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी हॉटेलमध्ये असलेले बारा हजार रुपये चोरून नेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार निकम करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रम
पुढील बातमी
मारहाण प्रकरणी तीन जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या