राष्ट्रीय मानवी तस्करी जनजागृती दिनानिमित्त विधी साक्षरता शिबीर व रॅलीचे आयोजन

by Team Satara Today | published on : 14 January 2025


सातारा : राष्ट्रीय मानवी तस्करी जनजागृती दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सातारा व सिध्दी विद्यालय, नगरपालिका शाळा, बालसुधार गृह, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आज रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती निना  बेदरकर, सह दिवाणी न्यायाधीश व स्तर, व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, सातारा एन.ए.गुप्ता, लोक अभिरक्षक कार्यालय सातारा चे विधिज्ञ, माजी समादेशक रस्ता वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण चे मधुकर शेंबडे उपस्थित होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती निना  बेदरकर यांनी अनुकूल कायदेशीर सेवा नालसा योजना, 2024 याविषयी सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली व मार्गदर्शन केले.

सदर बालसुधार गृह, सातारा व सिध्दी विद्यालय, नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्याना मधुकर शेंबडे यांनी सदर विधी साक्षरता शिबीरामध्ये रहदारी नियम, सुरक्षित वाहतूक, ट्रॅपीक एज्युकेशन या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. तसेच स्त्री भृण हत्या, बेटी बचाओ बेटी पढाओ, इतर सामाजक विघातक तत्वांबाबत जनजागृतीपर माहिती देण्यात आली. उपस्थित विद्यार्थ्यांना शेंबडे यांनी लिहीलेली रस्ता सुरक्षा पत्रिकांचे मोफत वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास व रॅलीमध्ये सुमारे 100 विद्यार्थी व शिक्षक उपस्थित असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांनी दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त काव्य लेखन स्पर्धा
पुढील बातमी
ऊस जळून आठ शेतकऱ्यांचे पाच लाखांचे नुकसान

संबंधित बातम्या