सातारा : प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा अध्यक्ष ए.एम. शेटे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा न्यायालय, सातारा प्रवेशद्वार आवार येथे मध्यस्थी जनजागृती शिबीर आयोजित करणेत आले होते. कार्यक्रमामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा कार्यालयामार्फत मध्यस्थी विषयक पथनाटय व्हिडीओ दाखवण्यात आला.
कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थितांचे स्वागत अॅड. निता फडतरे यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मिना नि. बेदरकर यांनी प्रास्ताविक व मध्यस्वी याविषयी माहिती दिली. तसेच अॅड. आर.एन. शेख, प्रशिक्षित मध्यस्य विधीज्ञ यांनी तडजोडीने वादाचे निराकरण कसे करायचे याबाबत माहिती दिली व मध्यस्थी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास अॅड. सयाजीराव घाडगे, अध्यक्ष वकील संघ, जिल्हा न्यायालय सातारा, सर्व विधिज्ञ, कर्मचारी व पक्षकार उपस्थित होते. अॅड. निता फडतरे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.