सातारा : शिवीगाळ, दमदाटी करत दगडाने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर खोले व त्याचे दोन अनोळखी साथीदार यांच्या विरुध्द गणेश लक्ष्मण साळुंखे (वय ३३, रा. सोमवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. ६ ऑक्टोबर रोजी घडली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार डमकले करीत आहेत.