फलटण: फलटण तहसील कार्यालय येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सागर गावडे व प्रहार दिव्यांग संघटनेचे फलटण तालुकाध्यक्ष महेश जगताप यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यातील विविध गावातील दिव्यांग बांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय फलटण येथे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
वेळोवेळी शासनाला लेखी निवेदने देऊनही दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या पूर्ण होत नसल्याने या विषयी नाराजी व्यक्त करून संघटनेने हे आंदोलन पुकारले आहे. गेले 2 तासांपासून हे ठिया आंदोलन सुरू आहे.. दिव्यांगांना घरकुलांसाठी जागा, रेशन धान्य विषय समस्या, संजय गांधी निराधार अनुदान योजना याविषयी समस्या घेऊन हे ठिय्या आंदोलन सुरू आहे.