सातारा : सातारा जिल्ह्यातील दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. सातारा शहर चे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र तासगाव येथे बदली झाली आहे, तर जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांची पुणे शहर पोलीस येथे वर्णी लागली आहे.
महाराष्ट्रातील 121 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश अप्पर पोलीस महासंचालक सुखविंदर सिंग यांनी जाहीर केले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांची पंधरा महिन्यात जिल्ह्याबाहेर पोलीस प्रशिक्षण केंद्र तासगाव येथे बदली करण्यात आली, तर गेल्या दोन वर्षापासून स्थानिक गुन्हे शाखेचा कार्यभार सांभाळणारे धडाडीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. याचबरोबर कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांना सुद्धा मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गृह विभागाकडून जाहीर करण्यात आले आहेत. संबंधित बदली झालेल्या अधिकार्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्यात यावे, असेही निर्देश देण्यात आलेले आहेत.
जिल्ह्यातील तीन पोलीस महिला उपनिरीक्षकांच्या सातारा जिल्हा बाहेर बदल्या झाल्या आहेत. यामध्ये उपनिरीक्षक कोमल पाटील यांची सातार्यातून कोकणपरिक्षेत्र, उपनिरीक्षक तृप्ती चव्हाण यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे, तर पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील यांची पुणे शहर येथे बदली झाली आहे.