सातारा : पानमळेवाडी पो.रामनगर गावच्या हद्दीत दुचाकी व ट्रॅव्हल्सचा झालेल्या अपघात प्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितामध्ये अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
शाहरुख चंदुलाल मुल्ला (वय 28, रा. शहापूर ता.कराड) व 15 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 3 मार्च रोजी घडली आहे. अल्पवयीन मुला दुचाकीवरुन ट्रिपलसीट बेदरकारपणे निघाला होता. त्यावेळी ट्रॅव्हल्स चालकही बेदरकारपणे निघाला होता. यामुळे दोन्ही वाहनांचा अपघात झाला. अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत. सातारा तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दुचाकी चालक अल्पवयीन मुलगा व ट्रॅव्हल्स चालक या दोघांवर गुन्हा दाखल केला.