08:08pm | Jan 20, 2023 |
फलटण : वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षित कारभारामुळे फलटण तालुक्यातील मौजे विडणी येथील मांगोबा माळ येथे गेल्या १० महिन्यांपासून केंद्रीय जल जीवन मिशन या योजनेच्या कामात कोट्यवधी रुपयांची वीज चोरी सुरू असल्याची बाब समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मौजे विडणी येथील मांगोबा माळ येथे केंद्रीय जल जीवन मिशन या योजनेचे काम सुरू असून गेल्या १० महिन्यांपासून याठिकाणी संबंधित ठेकेदाराने अवैधरित्या एल.टी पोलवरून बिनधास्त वीजवाहक तारांवर आकडे टाकून खुलेआम विजेची चोरी सुरू आहे. दिवस-रात्र हे आकडे तारांवर लटकलेलेच असतात. याठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असताना महावितरण अधिकारी व कर्मचारी याठिकाणी कारवाई करत नसल्याने तेही या वीज चोरीत सामील आहेत की काय, असा सवाल स्थानिक नागरीकांना पडला आहे.
संबंधित कॉन्ट्रॅक्टरने अवैधरित्या एल.टी.वीज वाहिन्यांवर आकडे टाकून थेट वीजजोड केली आहे या माध्यमातून वीजेची चोरी प्रकरण उजेडात आले आहे. मोठ मोठे दिवे, मोटर व ईतर वस्तू बाबत मोठया प्रमाणावर वीज चोरी करत विजेचा वापर सुरू असून आजअखेर कोट्यवधीची वीज चोरी झाली असून आजही वीज चोरी सुरू आहे. महावितरण कंपनीकडून वीज चोरी बाबत कडक अंमलबजावणी करत वीज चोरी पकडणेबाबत आदेश असताना मात्र फलटण ग्रामीण उपविभागातील महावितरण अधिकारी मात्र वीज चोरीबाबत डोळेझाक करताना दिसत आहेत.
वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणकडून भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र या भरारी पथकाकडून अपेक्षित कारवाई केली जात नसल्याने तसेच पकडले गेल्यास दंड भरून बाहेर पडण्याची पळवाट असल्याने चोरीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. वीजेची चोरी आणि गळतीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाचा भार महावितरण दरवर्षी सर्वसामान्य ग्राहकांवर दरवाढीच्या रुपात टाकत आहे. वीज चोरांची कृत्यांची किंमत प्रामाणिक सर्वसामान्य नागरिकांना भरावी लागत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे.
सदर बाबत यापूर्वी अनेक तक्रारी होऊनही मांगोबामाळ येथील केंद्रीय जल जीवन मिशन या कामावर होत असलेल्या वीज चोरीवर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे वरीष्ठ अधिकारी यांनी तरी किमान कोट्यवधीची होत असलेली व झालेली वीज चोरी पकडुन झालेल्या वीज चोरीची वसुली करावी तसेच जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर खातेनिहाय कारवाई करावी, अशी मागणी नागरकांमधून होत आहे.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |