अरे बापरे हे काय? ऐकावे ते नवलच.... त्यातर निघाल्या जयश्री दिगंबर नव्हे जयश्री संतोष आगवणे

फलटण येथील आत्महत्या प्रकरणाला विचित्र वळण देणाऱ्या जयश्रीताईंवर पीडित नणंदेचा पलटवार

by Team Satara Today | published on : 30 October 2025


फलटण :  योद्धे शरण येत नसतील तर त्यांना बदनाम करण्याचे कुटील षडयंत्र रचले जात आहे. काहींची सत्ता गेली तरी त्यांना वाटते आपण सत्तेत आहोत. वय झाले तरी त्यांना वाटते आपले डोके चालतेय. त्यांचे डोके भ्रमिष्ठाप्रमाणे  चालत आहे, असे कोणीतरी त्यांना समजून सांगा. त्यांचा हा भ्रमिष्टपणा फलटण तालुक्यातील लोकांची अब्रू घालवत असेल तर तालुक्याच्या अब्रूसाठी आम्ही प्राणांची बाजी लावून मात्र तालुक्याची अब्रू जाऊन देणार नाही, असा खणखणीत इशारा फलटण नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा आणि सुनिता जनार्दन आगवणे यांनी आज फलटण येथे पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, फलटण येथील आत्महत्या प्रकरणाला विचित्र वळण देणाऱ्या जयश्री दिगंबर आगवणे या नव्हे तर त्यात तर जयश्री संतोष आगवणे या निघाल्या असल्याचे धडधडीत पुरावे अनुप शहा यांनी पत्रकार परिषदेत दिल्यामुळे तालुक्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरवर अत्याचार व आत्महत्या प्रकरण सध्या राज्यभर गाजत असतानाच अनुप शहा आणि सुनिता जनार्दन आगवणे यांनी फलटण येथे पत्रकार परिषद घेऊन माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्यावर पडद्याआडून राज्यभरातून होत असलेल्या आरोपांची हवा काढून घेतली.अनुप शहा पुढे म्हणाले, सुनिता जनार्दन आगवणे या जयश्री आगवणे यांच्या सख्ख्या ननंद आहेत प्रत्यक्षात मात्र जयश्री आगवणे यांच्यावर फार मोठा अन्याय झाला असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे.

जयश्री आगवणे यांनी अनेक गुन्हे, पापे केली आहेत. त्यांनी घराच्या आसपासच्या महिलांची मंगळसूत्रे चोरली आहेत. विशेष म्हणजे जयश्री आगवणे यांचे  दिर दिगंबर आगवणे यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. ही माहिती संतोष आगवणे यांना कळाल्यानंतर त्यांनी ही बाब त्यांचे सासरे जनार्दन आगवणे यांच्या निदर्शनास आणून दिली.माझ्या माहितीप्रमाणे जनार्दन आगवणे यांचा जयश्री व दिगंबर यांच्यामध्ये अडथळा निर्माण होत असल्यामुळे जनार्दन आगवणे यांचा खून करण्यात आला.जयश्री आगवणे या जयश्री संतोष आगवणे आहेत, असे ओळखपत्रावर नोंद आहे. मिस्टर नटवरलाल म्हणजेच दिगंबर आगवणे याच्या जयश्री या अनधिकृत पत्नी आहेत. त्या अधिकृत पत्नी नाहीत. काल दिलीपसिंह यांचा फोटो अंधारेताई यांच्याबरोबर कसा असा प्रश्न उपस्थित केला गेला मात्र हा नटवरलाल रामराजेंसोबत कसा? महान नेते मेहबूब शेख यांना रसद कोठून पुरवली जाते असा प्रश्न उपस्थित करत अनुप शहा यांनी मेहबूब शेख यांच्यासमवेत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचा फोटो पत्रकार परिषदेत दाखवला. मेहबूब शेख हे काही दिवसांपूर्वी त्यांच्या फलटणच्या बंगल्यावर आले होते. त्यांना संबंधितांनी काही पॅकेज दिले का जागा याचा उहापोह झाला पाहिजे. याची स्पष्टता मेहबूब शेख यांनी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

जयश्री आगवणे या रणजितसिंह यांच्यावर नेहमीच बेछुट आरोप करीत असतात. हे आरोप राजकीय वैरातून केले जात आहेत. आमचे जेवढे राजकीय विरोधक आहेत त्यांच्याबरोबर यांचे फोटो आहेत. त्यांच्याकडून पैसे घेऊन आमच्यावर आरोप केले जातात, असेही अनुप शहा यांनी यावेळी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, अंधारेताई..... ज्यांनी आरोप केले ते तुमच्या शेजारी आणि ज्यांच्यावर अन्याय झाला, त्या माझ्या भगिनी (सुनिता जनार्दन आगवणे) या माझ्या शेजारी बसल्या आहेत. त्याही एक महिला आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही उभ्या राहणार का? मेहबूबभाई तुमची ही बहीण नाही का? अंधारेताई तुम्ही पॅकेज घेऊन बोलता असा आमचा आरोप नाही मात्र तसे असेल तर तुम्ही तुमचे पॅकेज सांगा, ते पॅकेज घरातून देईन शक्य नसेल तर फलटण तालुक्यात भिक मागून देईन मात्र माझ्या भगिनीला न्याय द्या. अंधारेताई तुम्ही ३ तारखेला

येणार आहात तर माझ्या बहिणीला भेटायला वेळ कधी देता? असा प्रश्न अनुप शहा यांनी उपस्थित केला. जयश्री आगवणे यांनी स्वतःच्या सासर्‍यांचा खून केला त्याचे माझ्याकडे मेडिकल रिपोर्ट आहेत असे सांगत अनुप शहा यांनी ते रिपोर्ट पत्रकार परिषदेत दाखवले.



ह.भ.प जयश्रीताई या तर चोर, डाकू....

पाकीट घेऊन सिलेक्टिव्ह भूमिका घेऊन चालणार नाही. जयश्री आगवणे या संजीवराजे यांच्या बंगल्यात जाता-येतानाचे फोटोंचा व्हिडिओ माध्यमांना दाखवत अनुप शहा म्हणाले, अंधारेताई, एकेकाळी जयश्रीताई यांचे फोटो शरद पवार, धैर्यशील पाटील यांच्यासमवेत आहेत. हभप जयश्रीताई यातर चोर, डाकू आहेत. तुम्ही वेळ द्या त्याबाबत मी तुमच्याबरोबर ऊहापोह करतो, असेही अनुप शहा यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी सुनिता आगवणे म्हणाल्या, जयश्री ही माझ्या सख्ख्या भावाची पत्नी आहे. लग्नानंतर दीड वर्षातच तिने चोऱ्या सुरू केल्या. त्यामुळे दोघांनाही त्यावेळी गावाकडे बोलवण्यात आले. ते दोघे गावाकडे आल्यानंतर त्या काळात दिगंबर आगवणे त्यांच्याकडे जाऊ लागला. यावरून वाद, भांडणे झाली मात्र जयश्रीने काहीही ऐकले नाही. दिगंबर आणि जयश्रीने माझ्या वडिलांचा खून केला, असा आरोप सुनीता आगवणे यांनी केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीवर पुण्यात बलात्कार

संबंधित बातम्या