सातारा पालिकेचा सोनचिरैया मकर संक्रांत महोत्सव सुरु

by Team Satara Today | published on : 11 January 2025


सातारा : बचत गटांसह महिलांनी चालवलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांना चालना देणारा सातारा पालिकेचा सोनचिरैया मकर संक्रांत महोत्सव शाहू कला मंदिरच्या प्रांगणात शुक्रवारपासून सुरू झाला. या महोत्सवात विविध प्रकारचे ८० स्टॉल्स उभारण्यात आले असून संक्रांतीमुळे हा महोत्सब महिला वर्गासाठी पर्वणी ठरणार आहे. 

या महोत्सवात भेट देणाऱ्या प्रत्येक महिलेला आकर्षक बक्षीस मिळणार आहे. साता-यातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तु, पदार्थाना बाजारपेठ मिळावी. तसेच त्यातून महिलांची आर्थिक उन्नती साधली जावी, यासाठी सातारा पालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत सोनचिरैया मकर संक्रांत महोत्सवाचे आयोजन शाहू कला मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले आहे. या महोत्सवातील स्टॉल्सवर खाडापर्थापासून ते संक्रांतीच्या सुगडयांपर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. हा महोत्सव दि. १० ते १२ जानेवारी या कालावधीत होणार असून सकाळी १० ते रात्री ९.३० वोजपर्यंत खुला असणार आहे. या महोत्सवात मकर संक्रांतीसाठी आवश्यक साहित्य, सुगड्या, हलव्याचे दागिने, गृह सजावटीचे साहित्य, बोरन्हाणसाठीचे कपडे, दागिने, साड्या, हळदी कुंकूसाठी आकर्षक साहित्य, रांगोळी, साड्या, ड्रेस मटेरियल, गृहपयोगी वस्तू, मसाले, पापड, अत्तर, उदयत्ती तसेच खवष्यांसाठी विविध याद्यपदाथांचे स्टॉल्स आहेत. 

हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी शहर अभियान व्यवस्थापक कीर्ती साळुंखे, गीतांजली यादव, जोशी तसेच राजधानी सातारा शहरस्तर संघ परीश्रम घेत आहे.

साताऱ्यातील महिला बचत गटांचे आर्थिक बळकटीकरण करण्यासाठी सातारा पालिकेकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. गृह उद्योगाच्या माध्यमातून विविध स्वरूपाचा व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी सातारकरांनी या महोत्सवाला भेट द्यावी, या महोत्सवात भेट देणाऱ्या प्रत्येक महिलेस हमखास आकर्षक बक्षीस मिळणार आहे.  - अभिजित बापट, मुख्याधिकारी, सातारा


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रसायनाने भरलेला बॅरलचा स्फोट
पुढील बातमी
बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांना "जागतिक मराठी भुषण" पुरस्कार प्रदान

संबंधित बातम्या