तुळशीच्या पानांचे शरीराला होणारे फायदे
मागील अनेक वर्षांपासून तुळशीचा वापर आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जात आहे. तुळशीची आरोग्याला अनेक फायदे होतात. धार्मिक कार्यात तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. शिवाय आयुर्वेदामध्ये तुळशीच्या पानांना विशेष महत्व आहे. तसेच अनेक लोक निरोगी आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित तुळशीचे एक पानं चावून खातात. ज्यामुळे आरोग्यासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. तुळशीच्या पानांमध्ये विटामिन सी आणि युजेनॉल, अँटीऑक्सिडंट्स आढळून येते. हानिकारक पेशींपासून शरीराचे होणारे नुकसान टाळण्यासाठी तुळशीच्या पानांचे सेवन केले जाते. सर्दी खोकला झाल्यानंतर तुळशीच्या पानांचा रस किंवा काढा बनवून दिला जातो.
सर्दी, खोकला, दमा, क्षयरोग, इन्फ्लूएंझा आणि ताप इत्यादी अनेक गंभीर आजारांपासून शरीराचे नुकसान होत नाही. तुळशीच्या पानांसोबतच तुळशीच्या बिया देखील आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. तुळशीच्या पानांचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते, मानसिक तणाव कमी होतो, पचनक्रिया सुधारते इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळतो. आज आम्ही तुम्हाला तुळशीच्या पानांचे सेवन केल्यामुळे आरोग्यासंबंधित कोणत्या समस्यांपासून आराम मिळतो, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
मधुमेह:
मधुमेह झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स इत्यादी आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी तुळशीचे पान किंवा तुळशीच्या पानांच्या रसाचे सेवन करावे. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहील. तसेच नियमित तुळशीच्या पानांचा रस प्यायल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
सर्दी खोकल्यापासून आराम:
थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांना सतत सर्दी किंवा खोकला लागतो. सर्दी खोकला वाढू लागल्यानंतर डेंग्यू, मलेरिया किंवा साथीच्या आजारांमध्ये वाढ होण्यास सुरुवात होते. साथीचे आजार शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करून टाकतात. त्यामुळे सर्दी खोकला झाल्यानंतर डॉक्टरांच्या गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी आयुर्वेदिक काढ्याचे किंवा तुळशीच्या रसाचे सेवन करावे.यामुळे सर्दी खोकल्यापासून आराम मिळेल.
किडनीसाठी प्रभावी:
किडनी स्टोनच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी तुळशीच्या पानांचे सेवन करावे. या पानाच्या सेवनामुळे किडनी स्टोन बाहेर पडून जाण्यास मदत होईल. यासाठी तुळशीच्या पानांच्या रसासोबत मध मिक्स करून प्यावे. यामुळे तुम्हाला लगेच फरक जाणवून येईल. तुळशीची पाने अनेक आजारांवर रामबाण उपाय आहेत.किडनी स्टोन झाल्यानंतर सतत पोटात दुखणे किंवा उलटी सारखे होणे इत्यादी लक्षणे जाणवू लागतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |