सातारा : कटगुण (ता. खटाव) येथील पिंकी जाधव खून प्रकरणातील संशयित विनोद विजय जाधव (वय २६) याला पुसेगाव पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. विनोदने डोक्यात चारित्र्याच्या संशयावरुन लोखंडी रॉड मारुन पत्नीचा खून केला आहे.
कटगुण येथील विनोद जाधव याने बुधवारी दुपारी पुसेगाव पोलिस ठाण्यात येऊन पत्नी पिंकीच्या डोक्यात रॉड मारल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून पिंकीला पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले होते.
या घटनेतील संशयित विनोद जाधव याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी दिली.