लातूर अर्बन को-ऑप. बँकेच्या कराड, सातारा शाखांचा आजपासून शुभारंभ

by Team Satara Today | published on : 25 January 2026


सातारा : सहकारी बँकामध्ये विश्वासार्ह व अग्रणी असलेल्या लातूर अर्बन को-ऑप. बँकेच्या 22 व्या शाखेचा शुभारंभ कराड शहरात तसेच 23 व्या शाखेचा शुभारंभ सातारा शहरात भारताच्या प्रजासत्ताक दिनी होणार आहे. 

लोकप्रिय असलेल्या या बँकेची स्थापना सन 1995 मध्ये बँकेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप राठी  यांनी केली असून आज बँकेचा व्यवसाय सुमारे 1400 कोटी रुपयांचा आहे. नेट एनपीए शुन्य टक्के आहे. कराड शहरात सिटी सेंटर हॉस्पिटल, शनिवार पेठ, कोल्हापूर नाका येथे तर सातारा शहरात ही शाखा मल्हार पेठ, साई लॉजजवळ ग्राहकांच्या सेवेत रुजू होत आहेत. दि. 26 जानेवारी  रोजी दोन्ही शाखांच्या शाखा उभारणीच्या कामकाजाची सुरुवात होणार आहे. 

या दोन्ही शाखांत कामाची सुरुवात श्रमी सत्यनारायण पूजन व प्रसादाच्या कार्यक्रमाने होणार आहे. कराड व सातारा शहर व परिसरातील सर्व नागरिकांनी या प्रसंगी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले आहे. या नव्या होत असलेल्या दोन्ही शाखेमुळे कराड व सातारा शहरातील व परिसरातील नागरिकांना आधुनिक बँकिंग सुविधा अधिक सुलभपणे उपलब्ध होतील. त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन  लातूर अर्बन बँक परिवार व राजेश बादाडे  (88569 22086), गोपाल जोशी    (9923143100) यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महायुतीसाठी दोनदा पुढाकार घेतला, पण प्रतिसाद नाही, त्यामुळे आता पुढाकार घेण्याचा प्रश्नच नाही - पालकमंत्री शंभूराज देसाई

संबंधित बातम्या