सातारा : संभाजीनगर येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी सकाळी नऊ वाजता अक्षय सुभाष मगर रा. संभाजीनगर, सातारा यांची घरासमोर पार्क केलेली दुचाकी क्र. एमएच 11 डीसी 4646 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गुरव करीत आहेत.