सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल क्रीडा स्पर्धा

राष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक 14 सप्टेंबर ते 23 ऑक्टोंबर, 2023 या कालावधीत करण्यात येणार आहे.

by Team Satara Today | published on : 24 July 2023


सातारा : सुब्रतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली यांच्यामार्फत सन 2023-24 या वर्षातील राष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक 14 सप्टेंबर ते 23 ऑक्टोंबर, 2023 या कालावधीत करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सातारा यांच्यावतीने सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल क्रीडा स्पर्धेतील 14 वर्षे मुले व 17 वर्षे मुले/मुली या वयोगटांचे आयोजन श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे दिनांक 01 ऑगस्ट, 2023 पासून करण्यात येणार आहे.

ज्या शाळा/महाविद्यालयांना सदर क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायच्या आहे. त्यांनी आपला प्रवेश अर्ज मुख्याध्यापक / प्राचार्य यांच्या स्वाक्षरीने दिनांक 28 जुलै, 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे सादर करणे आवश्यक आहे. तद्नंतर येणा-या प्रवेश अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. तसेच सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणा-या करिता खेळाडूची जन्मतारीख खालीलप्रमाणे असावी.

सुब्रतो मुखर्जी 14 वर्षाखालील मुले इ. 6 वी व त्या पुढील दिनांक 01 जानेवारी 2010 अथवा त्या नंतरचा तसेच 17 वर्षाखालील मुले व मुली त्या पूढील दिनांक 01 जानेवारी 2007 अथवा त्यानंतर जन्मलेले असावेत.

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा/महाविद्यालयांनी सहभागी व्हावे; असे आवाहन श्री. नितीन तारळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री. सुमित पाटील, क्रीडा मार्गदर्शक यांच्याशी 8793424444 या क्रमांकावर संपर्क साधावा.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील ट्राफिक ब्लॉक साडे तीन तासानंतर संपला
पुढील बातमी
यवतेश्वर घाटातील धोकादायक दगड बांधकाम विभागाने हटवला

संबंधित बातम्या