मुंबई : सुप्रीम कोर्टाने नागपूर खंडपीठाचे निकाल कायम ठेवताना नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा निकाल 21 डिसेंबरलाच लागेल यावर शिक्कामोर्तब केले आहे. नागपूर खंडपीठाच्या निकालात सुप्रीम कोर्टाने कुठलाही बदल केला नाही.
नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. सुनावणीमध्ये कोर्टाने ही याचिका निकाली काढत आपला अंतिम निर्णय दिला आहे.सुप्रीम कोर्टाने निर्देश देताना म्हटले की, काही कारणाने 20 डिसेंबरला होणाऱ्या काही नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुक पुढे ढकलल्या गेल्यानंतर दोन डिसेंबरला झालेल्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरलाच जाहीर करावा. तो पुढे ढकलू नये.
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका 31जानेवारीपूर्वी घेण्याचे निर्देश कोर्टाने यापूर्वीच निवडणूक आयोग, राज्य सरकारला दिले होते. आत्ता देखील नागपूर खंडपीठाच्या निकाला विरोधातील याचिका फेटाळली तसेच निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याची 31 जानेवारीची मुदत पाळावी, असे देखील सांगितले. 20 डिसेंबरला काही नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी आणि तसेच 154 सदस्यांसाठी मतदान होणार आहे. मात्र, दोन डिसेंबरला मतदान झाल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले होती की, सुप्रीम कोर्टात सरकार जाईल आणि त्यामुळे निकाल हा 20 डिसेंबरच्या आधीच लागेल. मात्र, मुश्रीफ यांच्यासह अनेकांचे अंदाज चुकला असून निकाल 21 डिसेंबरलाच लागणार आहे.