विवाहितेच्या जाचहाट प्रकरणी चार जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 25 March 2025


सातारा : विवाहितेच्या जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जून 2020 ते 2 मार्च 2025 दरम्यान सोनाली शुभम वायदंडे सध्या रा. मोळाचा ओढा, सातारा या विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ केल्याप्रकरणी पती शुभम जालिंदर वायदंडे, सासू अनिता जालिंदर वायदंडे, सासरे जालिंदर विष्णू वायदंडे, दिर संकेत जालिंदर वायदंडे सर्व रा. शाहूनगर, सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार यादव करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चाहूर येथे भंगार च्या गोडाऊनला भीषण आग
पुढील बातमी
शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी 16 जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या